पुणे दिनांक २१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम ) महाराष्ट्रात आज रविवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस अनेक ठिकाणी बरसत आहे.अशातच आता पुढील ३ ते ४ तासांत ठाणे मुंबई व पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसाळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.IMD च्या वतीने तसा इशाराच दिला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी काळजी घ्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे देखील सांगण्यात आले आहे.दरम्यान मुंबई.ठाणे.रत्नागिरी . कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या वतीने आज मुंबईसह कोकणातील आणि राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसाळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ व जिल्हा प्रशासन . पोलिस.महापालिका.नगरपालिका.विविध स्थानिक स्वराज्य संस्थानी सतर्क रहावे.न नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी.अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत.याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की.समुद्र किनारी जाऊ नये.तसेच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा.कृपया काळजी घ्यावी.व गरज पडल्यास १०० नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन पोलिसांनी केले आहे.दरम्यान मुंबईत मागील तीन दिवसांपासून पासून मुसाळधार पाऊस कोसळत आहे.तीन दिवसांत ३२६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.तर दिनांक २० जुलै रोजी कुलाबा येथे १११ मिली मीटर ते सांताक्रूझ येथे ९३ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.