Home Breaking News एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

243
0

पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे.दरम्यान रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे एक्स्प्रेसचे इंजिन हे बंद पडले  यामुळे लोकल व लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ह्या अडकले आहेत ‌विशेषत: कल्याण.अंबरनाथ.बदलापूर कर्जत.कसारा.या मार्गावरील लोकल सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून म‌ऊ एक्स्प्रेस ही निघाली होती.मात्र ती डोंबिवली व ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान आली असताना इंजिन बंद पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे.दरम्यान दुसरे इंजिन आल्यावर ते जोडून आता रेल्वे एक्स्प्रेस ही मार्गस्थ करण्यात आली आहे.

Previous articleपहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी
Next articleमनोरमा खेडकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here