पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाराष्ट्रात एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांड घडले असून याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक संबंधातून गर्भपात करण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सदरचा मृतदेह हा इंद्रायणी नदीत फेकण्यात आला.यावेळी मृत महिलेच्या दोन मुलांनी यावेळी आरडाओरडा केली असता आरोपींनी दोन लहान जिवंत मुलांना देखील नदीत फेकून दिले.याप्रकरणी पोलिसांनी 👮 आरोपी व त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.या बाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.दरम्यान या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.