पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) श्रावण महिना आजपासून दिनांक २२ जुलै सुरू झाला आहे.त्यामळे भाविकांनी पहिल्याच श्रावणी सोमवारी पहाटे पासूनच मुंबईतील शंकराच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.व भोलेनाथाचे दर्शन घेतले.तसेच हरिद्वार येथे भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी आज पहाटे पासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.तसेच मध्यप्रदेशातील उज्जैन येथे महाकालीची पूजा करण्यात आली आहे. दरम्यान हिंदूंसाठी पवित्र मानला जाणारा श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो. दरम्यान महाराष्ट्रात ५ ऑगस्टला श्रावण मासारंभ सुरू होणार आहे.
दरम्यान श्रावणात महादेवाला चुकूनही सिंदूर आणि रोजी अर्पण करु नये.तसेच महादेवाला हळद अर्पण करू नये.व महादेवाला तुळशीचे पानं अर्पण करु नये. तसेच श्रावण महिन्यात मांस मटण व अल्कोहोलचे सेवन करु नये.तसेच या कालावधीत कांदा व लसूण आदींचे सेवन करु नये.