पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत मुसाळधार पाऊस कोसळत आहे.तसेच काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजला आहे.यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतजमीन ही पाण्यात गेली आहे.व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर काही लोकांच्या घरात पाणी शिरल्याने आहे. तर काही घरांची या पावसात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.त्या शेकडो क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.शेतकरी वर्गाचे ३३ % टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.