पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईच्या मुलुंड येथे एका भरघाव वेगाने ऑडी कार चालकाने दोन रिक्षांना जोरात धडक देऊन फरार झाला होता.या अपघातात दोन प्रवासी व दोन रिक्षा चालक हे गंभीररीत्य जखमी झाले होते.यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या चार जणांना मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान अपघाता नंतर ऑडी कार चालक हा घटनास्थळावरून पळून गेला होता. तसेच या अपघातात दोन्ही रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले होते.
दरम्यान या अपघाताबाबत मुंबई येथील मुलुंड पोलिस स्टेशन मध्ये ऑडी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी घटनास्थळा वरुन फरार झालेल्या ऑडी कार चालकाच्या आता मुसक्या आवळल्या आहेत.तसेच त्याला शासकीय रुग्णालयात नेवून त्याची चालकाची वैद्यकीय तपासणी केली आहे.तसेच त्याचे रक्ताचे नमुने हे तपासणी साठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.अशी माहिती मुलुंड पोलिसांकडून मिळत आहे.