पुणे दिनांक २२ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सोमवर दिनांक २२ जुलै सुरू होणार आहे.अधिवेशन मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करतील.यात नवीन टॅक्स धोरणांची घोषणा करण्यात येऊ शकते.या अधिवेशनात एकूण सहा विधेयके सादर करण्यात येतील.तर या विधेयकात जुन्या विमान अधिनियमला बदलण्याच्या विधेयकाचा समावेश असू शकतो.सदरच्या अधिवेशनाचा कालावधी हा एकूण १९ दिवसाचा असू शकतो.तर हे अधिवेशन दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत चालेल.
दरम्यान या अधिवेशनात संपूर्ण भारतात गाजलेला नीट पेपर घोटाळा.रेल्वे सुरक्षा.केंद्रीये संस्थाचा गैरवापर बेरोजगारी.आणि महागाई.आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा.तसेच ओडिशा व बिहार राज्याला विशेष दर्जा.देण्याबाबत मागणी या अधिवेशनात होऊ शकते.शेतक-यांचे विविध प्रश्न. मणिपूर येथील हिंसाचार अशा अनेक प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरु शकतात.तसेच लोकसभेतील उपसभापतीपद विरोधी पक्षांना देण्यात यावे.अशी मागणी होऊ शकते.