पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सन २०२४ ते २५ चार एक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.आज सकाळी ११ वाजता सदनात अर्थसंकल्पा ला सुरुवात होणार आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा हा लोकसभा निवडणूका नंतरचा पहिलाच अर्थसंकल्प आहे.नवीन पेन्शन प्रणाली मध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.तसेच पायाभूत योजनावर भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे.तसेच शेतकरी वर्ग तसेच कामगार वर्ग.या दोन्ही वर्गाला खुश करण्याची शक्यता आहे.तसेच तीन महिन्यांत विधान सभेच्या निवडणूका होत आहे.त्यामुळे आजच्या अर्थ संकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय खास योजना व तरतूद या अर्थसंकल्पात आहे.आज स्पष्ट होणार आहे.तसेच रेल्वे साठी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला किती मोठी तरतूद होते.याकडे देखील नागरिकांचे लक्ष लागले आहे.तसेच पेट्रोल व डिझेल तसेच सीएनजी.तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत महिलावर्गाला दिलासा मिळणार का ? हे देखील आजच्या अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे. तसेच पीएम किसान योजना.आवास योजना.रोजगार वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद होण्याची शक्यता आजच्या अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे. व या संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.