पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील लोणीकंद भागात राहणाऱ्या व कौटुंबिक वादातून रागाने पतीने पत्नीच्या डोक्यात कु-हाड घालून तिच्या खून केला आहे.दरम्यान या घटनेनंतर लोणीकंद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यात खून झालेल्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई जाधव असे नाव आहे.तर खून केलेल्या पतीचे नाव बाबा जाधव असे आरोपीचे नाव आहे.बाबा व त्याची पत्नी लक्ष्मीबाई या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. दरम्यान काल सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला होता.दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी झोपलेली असताना बाबा यांने पत्नी लक्ष्मीबाई हिच्या डोक्यात कु-हाडीच्या सहाय्याने सपासप घाव घालून तिचा खून केला.यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.