पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कोथरूड भागात एक मोठी दुर्घटना घडली असून पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची घटना अगदी थोड्या वेळापूर्वी घडली आहे.यात एका खासगी बसच्या चालकाने एकूण ३ ते ४ वाहनांना जोरात धडक दिल्याची घटना घडली असून यात खासगी बसचा चालक हा मद्यधुंद असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.या अपघातामुळे कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.