पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शिक्षण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून पुणे.तसेच पिंपरी -चिंचवड व पुणे जिल्ह्यातील एकूण ४९ शाळा 🏫 अनधिकृत घोषित करण्यात आल्या असून यातील १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.यातील १३ शाळांची नावे या प्रमाणे आहेत.
किड्जर्जी स्कुल.शालीमार चौक दौंड , जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी दौंड,यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी दौंड, भैरवनाथ इंग्लिश मीडीयम स्कूल मोई खेड, संस्कृती इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव खुर्द.हवेली, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बालविकास मंदीर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी,रिव्हस्टोन इंग्लिश मीडीयम स्कूल,पेरणेफाटा,सोनाई इंग्लिश मीडीयम स्कूल साई नगर गहुंजे तालुका मावळ, व्यंकेश्र्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव तालुका मावळ, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी,श्री चैतन्य इंग्लिश मीडीयम स्कूल विशाल नगर पिंपळे निलख,व केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कूल अशी या शाळांची नावे आहेत.