Home Breaking News उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आज दुपारी सोडणार उपोषण

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आज दुपारी सोडणार उपोषण

261
0

पुणे दिनांक २४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षण साठी अंतरवाली सराटीत उपोषणला बसलेले मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी अचानकपणे आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे ‌.तसेच त्यांनी राज्य सरकारला १३ ऑगस्ट पर्यंतची डेडलाइन दिली आहे.दरम्यान या २० दिवसांत शिंदे सरकारने आमच्या व सर्व मागण्या मान्य कराव्यात,असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.तसेच सलाईन लावून उपोषण करण्याला काही अर्थ नाही.असे देखील जरांगे पाटील यांनी आज सकाळी अंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

दरम्यान काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती.त्यामुळे काळजीपोटी ४० जणांनी माझे हातपाय बांधून मला सलाईन लावण्यात आले.पण सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही.आज बुधवारी दुपारी  अंतरवाली सराटीतील महिलांच्या हाताने पाणी पिऊन मी माझे उपोषण स्थगित करणार आहे.असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.तसेच राज्य सरकार ला १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे.तसेच १३ ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Previous articleखडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना
Next articleनेपाळच्या काठमांडूत टेकऑप करताना विमान दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here