पुणे दिनांक २४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.दरम्यान पुणे जिल्ह्या मध्ये देखील धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन खडकवासला हे धरण देखील मोठ्या प्रमाणात भरलं आहे त्यामुळे आता या धरणाचे दरवाजे उघडले आहेत या धरणाचे पाणी हे मुठा नदीच्या पात्रात सोडले जात आहे.त्यामुळे खडकवासला धरणाच्या पाटबंधारे विभागाचे वतीने स्थानिक प्रशासन व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे पुणेकर नागरिकांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीच्या पात्रात आज बुधवारी सकाळी साडेसहा वाजल्या पासून जवळपास ४ हजार ७०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.