पुणे दिनांक २४ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून नेपाळच्या काठमांडूतील आंतरराष्ट्रीय त्रिभुवन विमानतळावर आज सकाळी विमान टेकऑप करताना रणवेवरुन विमान घसरुन मोठी घटना दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत विमानातील एकूण १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.तर विमानाचा पायलट हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी करिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान हे विमान जमिनीवर पडल्यानंतर विमानाला लगेच 🔥 आग लागली या विमानात एकूण १९ प्रवासी होते.हे विमान काठमांडू येथून पोखराकडे जात होते.दरम्यान हे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.दरम्यान हे विमान रणवेवर कोसळून आग लागल्यानंतर नंतर विमानतळाच्या प्रशासनाच्या वतीने त्वरित विमानातील लोकांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतू यात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर विमानाचा पायलट हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे.असे सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे.