पुणे दिनांक २४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव टाकला,त्यांचे पुरावे मी दिले.तसेच कोर्टाच्या आदेशाने देशमुखांवर गुन्हा दाखल दाखल आहे.असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.१०० कोटींच्या वसुलीच्या केसमधून देशमुख सुटलेले नाहीत ते जामीनावर बाहेर आहेत.मी कुणाच्या नादी लागत नाही.व कोण माझ्या नादी लागलेतर सोडत नाही.असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला होता.असा गंभीर आरोप तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेनी आता हा आरोप केला आहे.तसेच त्यांनी सीबीआयने नोंदवलेल्या जबाबात पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढेनी हा आरोप केला आहे. व तसेच देशमुख यांनी मला जवळपास ४ ते ५ फोन केले होते.तसेच धमकीसुध्दा दिली होती.गिरिश महाजनांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी कट रचण्यात आला होता.असे देखील प्रवीण मुंढे यांनी सांगितले आहे.