पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर व धरण परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.मागील २४ तासांत पुण्यात व उपनगर परिसरात तसेच धरण क्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.आता यात आज हवामान विभागाच्या वतीने पुणे शहर व जिल्ह्या मध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे.दरम्यान हवामान विभागाच्या इशारा नुसार पुढील काही तासांमध्ये पुणे शहर तसेच पिंपरी -चिंचवड.भोर .वेल्हा.मावळ, मुळशी हवेली तसेच खडकवासला या परिसरात मुसळधार ते अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान पुणे शहर व उपनगरात मागील २४ तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊस कोसळत आहे.पावसाने पुण्यात थैमान घातले आहे.खडकवासला धरण हे १०० टक्के भरले आहे.धरणातून मोठ्या प्रमाणावर मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले असून अनेक लोक सोसायट्या मध्ये अडकून पडले आहेत.पुणे शहरातील सर्वच रस्ते हे जलमय झाले आहेत.पुण्यात एनडीआरएफ कडून मदत व बचावकार्य सुरू केले आहे.तसेच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.तसेच खबरदारी म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी शाळा व कॉलेज व कार्यालयाला सुट्टी देण्यात आली आहे.तसे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.तसेच आता हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील २४ तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसाळधार ते अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तसेच हायअलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान आता खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या क्युसेक मध्ये घट केली आहे.पण पुणे शहर धरण परिसरात अजून मुसाळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे धरण क्षेत्रातून पुन्हा पाणी सोडले जाऊ शकते.दरम्यान रात्रीच्या वेळी अचानकपणे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले.त्या मुळे पुण्यातील अनेक घरांत पाणी शिरल्याने आता नागरिक हे चांगलेच संतप्त झाले आहेत.पुणे महानगरपालिकेच्या वतीने कालच नदी काठावरील लोकांना सुरक्षित स्थळी न हालवल्याने आता नागरिक हे चांगलेच संतप्त झाले असून ते पुणे महानगरपालिका व नगरसेवक व आमदार यांच्यावर आपला राग एकंदरीत व्यक्त करत आहेत.