Home Breaking News खडकवासला धरणांतून मुठानदीत पाण्याचा विसर्ग सुरू,एकता नगर भागात पाणी भरण्यास सुरुवात

खडकवासला धरणांतून मुठानदीत पाण्याचा विसर्ग सुरू,एकता नगर भागात पाणी भरण्यास सुरुवात

115
0

पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात पहाटे पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.पुणे शहरात अनेक भागातील घरात व सोसायट्या मध्ये पाणी शिरले.त्यामुळे अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले.व पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.आता पुन्हा एकदा खडकवासला धरणा मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रात सोडले जात आहे.त्यामुळे पुन्हा एकदा सिंहगड रोड वरील एकता नगर भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे.काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या भागात जाऊन पूरस्थितीची पाहाणी केली होती.दरम्यान धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.तसेच याठिकाणी NDRF ची टीम घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे.

Previous articleपुण्यात मृतांच्या तीन नातेवाईकांना ५ लाखांची मदत
Next articleपुण्यात पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग कमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here