Home Breaking News पुण्याला रेड‌अलर्ट शाळा कॉलेजना सुट्टी, सिंहगड रोड वरील पाच सोसायटी मध्ये पाणी...

पुण्याला रेड‌अलर्ट शाळा कॉलेजना सुट्टी, सिंहगड रोड वरील पाच सोसायटी मध्ये पाणी साचले.खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला

106
0

पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील २४ तासांहून जास्त पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.खडकवासला धरणा मधून मोठ्या प्रमाणावर पाणी मुठा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने पुण्यातील भीडे पुल हा पाण्या खाली गेला आहे.तसेच सिंहगड रोड वरील पाच सोसायटी मध्ये पाणी गेल्याने अनेक नागरिक हे घरात अडकून पडले आहेत.’हवामान खात्याच्या वतीने पुणे शहर व भोर . वेल्हा.मावळ.मुळशी.हवेली तसेच खडकवासला परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच अतिमुसाळधार पाऊसाचा इशारा दिला आहे.पुण्यातील शाळा व कॉलेजला आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.तसेच पुण्यातील नागरिकांनी काम असेल तरच घरा बाहेर पडा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान लोणावळा येथे ☁️ ढगफुटी सारखं पाऊस कोसळत आहे.त्यामुळे  या भागातील शाळा व कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.मागील २४ दिवसां पासून पुण्यात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.पुणे  शहराला पावसाने झोडपून काढले आहे.शहरातील विविध रस्त्यावरुन पाणी वाहू लागले आहे.डेक्कन मधील पुलाची वाडी येथेल घरात पाणी शिरले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेकने पाणी सोडले आहे.याची कल्पना पुणे महानगरपालिकेला दिली नव्हती.त्यामुळे डेक्कन येथील पुलाची वाडी येथील ७० घरे पाण्याखाली गेले आहे.दरम्यान पुण्यातील सिंहगड रोडवरील सोसायटी मध्ये अनेक लोक हे घरात अडकून पडले आहेत.तसेच अग्निशमन नियंत्रण कक्षात अनेक काॅल येत आहे. पुण्यातील अनेक भागात पडझड झालेली आहे.यात कोणीही जखमी झाले नाहीत.दरम्यान पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.गरवारे काॅलेजमधील  खिल्लारे वस्ती काॅलेज परिसर.शिताळा देवी मंदिर डेक्कन.संगमपूल पुला समोरील वस्ती. होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.दरम्यान खडकवासला धरणातून पहाटे अचानकपणे ४० हजार क्यूसेकने पाणी मुठा नदीच्या पात्रात सोडल्याने पुण्यातील अनेक भागात सोसायटी व घरात पाणी गेले आहे.आता सिंहगड रोडवरील सोसायटी मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्या साठी आता बोट आणण्यात आली आहे.

Previous articleपुण्यातील जंगली महाराज रोडवर वाहतूक व्यवस्था कोलमडली
Next articleलवासात दरड कोसळून दोन व्हिला गाडले ३ ते ४ लोक बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here