पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथे दिनांक १९ मे रोजी झालेल्या पोर्श कार अपघात झाला होता.यात आयटी इंजिनियर अश्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला होता.हे दोघेजण मुळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी होते.व ते पुण्यातील आयटी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होते.आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण ९०० पानांचे चार्जशीट पुणे सत्र न्यायालयात केले आहे.तसेच राज्य सरकारच्या वतीने विषेश सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान या पोर्श कार अपघातप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले.व सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळे हे प्रकरणात पुढे अनेक नवनवीन खुलासे होत गेले.आणि या अपघातात पुणे पोलिसांच्य कार्यक्षमतेवरच अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तसेच या अपघाता प्रकरणी राजकीय हस्तक्षेपा बदल देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता.दरम्यान यात १९ मे रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलाने पोर्श कार चालवून एका बाईकला जोरात धडक दिल्याने यात दोन आयटी इंजिनियर यांचा मृत्यू झाला होता.यात अपघातावेळी अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता.यात अल्पवयीन मुलाला अटक झाली होती पण त्याची फक्त १५ तासात निबंध लिहिण्याच्या शर्थीवर आरोपीची जामीनवर मुक्तता करण्यात आली होती.यावर समाजमाध्यामांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.पुढे अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलणं व कारचा चालकाला धमकावून त्याला तु स्वतःच कार चालवत होता असे सांगणे या अपघात प्ररकणी सर्व अग्रवाल कुटुंब तुरुंगात गेले होते.तसेच रक्तात फेरफार करणां-या दोन डाॅक्टर व एक शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना देखील अटक करण्यात आली होती.व त्यांचे निलंबन देखील करण्यात आले होते.यात काही पोलिसांना देखील निलंबित करण्यात आले.हे अपघाताचे प्रकरण संपूर्ण भारतात गाजले होते.तसेच विधानसभा व विधान परिषदेत देखील यावर विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठविला होता.त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करीत आज पुण्यातील सत्र न्यायालयात एकूण ९०० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे.