पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आज शुक्रवार दिनांक २६ जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावर पावसाचा संकट उभे आहे.दरम्यान आज पॅरिस मध्ये हवामान विभागाच्या वतीने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.दरम्यान संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उद्घाटन सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.दरम्यान खेळाचा महाकुंभ दर ४ वर्षांनी आयोजित केला जातो.त्यामुळे क्रीडाप्रेमी या महाकुंभाची वाट आतुरतेने पाहत असतात
दरम्यान आज सर्वोच्च क्रीडा स्पर्धा आजपासून फ्रान्स ची राजधानी पॅरिसमध्ये रंगणार आहे.दरम्यान आज या ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन रात्री ११ वाजता होणार आहे.विषेश म्हणजे यंदा हे उद्घाटन बंदिस्त स्टेडियममध्ये होणार नसून ते पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या शेजारुन वाहाणा-या सीन नदीच्या पात्रात हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.खेळाडूंचे संचालन . सांस्कृतिक कार्यक्रम ⛵ बोटीवरच होणार आहेत.या ठिकाणी एकूण २ लाख क्रीडा चाहते उपस्थित राहणार आहेत.दरम्यान या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर नजर असणार आहे.ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पॅरिसमध्ये रंगणार आहे.यामध्ये भारताचा १०० पेक्षा जास्त खेळाडूंचा संघ भाग घेणार आहे.सीन नदीवर हा ऐतिहासिक सोहळा रात्री ११ वाजता असून यात भारताचे ध्वजवाहक म्हणून बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू व टेबल टेनिसपटू शरथ कमल हे दोघेजण दिसणार आहेत.हे दोन्ही खेळाडू भारतासाठी यंदा सुवर्ण जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यातील संचालनात टीम इंडियाचे पथक हे ८४ व्या स्थानावर आहे.