पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बाबाजानी दुर्रानी हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.जातीवादी पक्षांसोबत राहिल्याने मुस्लिम समाजात संताप आहे.त्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान यापूर्वी गुरुवारी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवास स्थानी भेट दिली होती.तेव्हापासूनच दुर्रानी यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती.
दरम्यान या प्रकरणी बोलताना बाबाजानी दुर्रानी हे म्हटले की मी भविष्यात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये शरद पवारांची भेट घेतली.त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते महायुतीत काम करताना अडचण येत आहे.तसेच कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर घालमेल होते त्यामुळे मी समविचारी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.असे बाबाजानी दुर्रानी यांनी म्हटले आहे. दरम्यान पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही स्वगृही परतण्यास तयार आहोत.नाही भेटली तर अपक्ष लढू पण कोणत्याही परिस्थितीत महायुतीतून लढणार नाही.असे वक्तव्य आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे पुत्र जुनेद दुर्रानींनी केले होते.त्यामुळे आता अजित पवार यांना आणखी एक धक्का बसणार असल्याचे निश्चित झाले आहे.