पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकप व झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया ही श्रीलंका येथे दाखल झाली आहे.तसेच आजपासून सुरू होणाऱ्या नवीन मालिकेसाठी सज्ज झाली असून भारतीय क्रिकेट 🏏 संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.या दौऱ्यात टी-२० तसेच वनडे मालिका होणार असून आजपासून टी-२० मालिका सुरू होत असून आज सायंकाळी सात वाजता मालिका सुरू होणार आहे.आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वा खाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.तर श्रीलंकेचा संघ यावेळी नवखा असून त्यामुळे भारताला विजयाची संधी आहे.तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडोच्या जागी रमेश मेंडिसला संघात स्थान देण्यात आले आहे.