पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवी मुंबई येथील बेलापूर येथे आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे.सेक्टर १९ मधील शाहबाज गावा मधील इंदीरा निवास जी पल्स ही इमारत कोसळली आहे.यात अडकलेल्या दोन वृध्दांना इमारतीमधून बाहेर काढले आहेत.तर एकजण यात ढिगा-या खाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान जीवीतहानी टळली आहे.
दरम्यान या घटनेची सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रिक्षा चालक इमारतीच्या खाली असताना त्याला या इमारतीच्या पिलरचा आवाज आल्याने त्यांने इमारती मधील सर्व रहिवाशांना प्रथम बाहेर काढले त्यानंतर काही क्षणातच ही इमारत कोसळली आहे.दरम्यान अडकलेल्या दोघां वृध्द लोकांना देखील बाहेर काढण्यात आले असून एकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान ही इमारत कोसळलेल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.आता इमारतीचा मलबा पाठविण्याचे काम सुरू आहे.सदरच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.