पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात दोन दिवस मुसाळधार पाऊस कोसळत होता.त्यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळित झाले होते.मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने तसेच खडक वासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.तसेच पुण्यातील भिडे पूलावरील पाणी ओसरल्यावर तसेच बाबा भिडे पूल व नदीपात्रातून वाहतूकीला सुरवतही करण्यात आली आहे.दरम्यान धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत होता.व खडकवासला धरण हे १०० टक्के भरले असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडल्याने भिडे पूल हा पाण्याखाली गेला होता.त्यामुळे हा पूल व या भागातील नदीपात्रातील वाहतूक बंद करण्यात आली होती.ती आजपासून सुरू झाली आहे.दरम्यान खडक वासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थिती नुसार धरणातून पुन्हा मुठा नदीच्या पात्रात पून्हा विसर्ग करण्यात येईल.तरी नदीच्या काठावर वसलेले नागरिकांनी यांची दक्षता घ्यावी.असे खडक वासला पाटबंधारे विभाग व पुणे पाटबंधारे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.