Home Breaking News वाशीत हिट अँड रनची घटना,इनोव्हाच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

वाशीत हिट अँड रनची घटना,इनोव्हाच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

84
0

पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ मध्ये शनिवारी साईनाथ स्कूल जवळ एका इनोव्हा कारच्या चालकाने दोन कार व आणि एक ऑटोला जोरात धडक दिलेल्या भीषण अपघातात रिक्षाचा चक्काचुर झाला आहे.यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे.अपघातानंतर इनोव्हा कार चालक झाला फरार , आरोपी इनोव्हा कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान या अपघातात रिक्षा चालक मुन्नालाल गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे तर इनोव्हा कार चालक भागवत तिवारी घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान अपघातग्रस्त इनोव्हा कार ही पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस या अपघातप्रकरणी तपास‌ करीत आहेत.तसेच अपघाताच्या ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच अपघातावेळी इनोव्हा कारच्या चालकाने दारु प्यायली होती.होती का याचा देखील पोलिस तपास करीत आहेत.

Previous articleकॅमेरे आणि पत्रकारांचा प्रश्न काॅग्रेसचे आमदार चक्क पळाले
Next articleमुंबईतील अर्नाळा समुद्रात अल्पवयीन जोडप्याने मारली उडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here