पुणे दिनांक २८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खडकवासला धरणातून आज सकाळी दहा वाजल्यापासून मुठा नदीच्या पात्रात ११ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान मागील दोन दिवसांपूर्वी अचानक पुणे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अनेक नागरिकां च्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट याबाबत दिला नव्हता.असा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात आला होता.त्यानंतर आता अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान पुण्यातील पुरानंतर आता झोपलेली पुणे महानगरपालिका आता चांगलीच खडबडून जागी झाली आहे.उद्या पासून नदीपात्रातील अतिक्रमण काढणार आहे.अशी माहिती अतिक्रमण विरोधी. पथक प्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे. तसेच नदीपात्रात टाकलेला भराव जेसीबीच्या सहाय्याने काढणार आहे.तसेच नदीपात्रात राडारोडा टाकणा-या बांधकाम व्यावसायिकांना आता १ कोटी रुपये दंड आकारण्यात येणार आहे.तसेच गुन्हा देण्यात दाखल करण्याचा इशारा देखील माधव जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.एकंदरीत काय तर आता झोपलेली पुणे महानगरपालिकेला आता पुण्यात पूर आल्यानंतर जागी झाली आहे.