पुणे दिनांक २८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रेल्वे ट्रेन मॅनेजर मेल एक्स्प्रेसचे दिलिप किसन नांदखिले हे आज रेल्वे सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत.आज त्यांनी सकाळी आठ वाजता पुणे ते सोलापूर रेल्वे ट्रेन ही दौंड रेल्वे जंक्शन येथे घेऊन आले यावेळी दौंड रेल्वे जंक्शन स्टेशन वर रेल्वेचे ट्रेन मॅनेजर स्टाफ इतर कर्मचारी आणि कुटूंबातील सर्व सदस्य यांनी यावेळी हार घालून व फुलांचे गुच्छ देऊन यावेळी स्वागत केले.
दरम्यान यावेळी दौंड रेल्वे स्टेशन येथील ट्रेन मॅनेजर लाॅबीमध्ये देखील या वेळी सहकारी सर्व रेल्वे ट्रेन मॅनेजर व इतर कर्मचारी यांनी सेवा निवृत्त दिलिप नांदखिले यांचा हार व फुलांचे गुच्छ देऊन सत्कार केला.दरम्यान दिलिप नांदखिले हे सन ५ जानेवारी रोजी रेल्वेच्या सेवेत रुजू झाले त्यांनी रेल्वेत अखंडपणे ४० वर्षे व ७ महिने रेल्वेची या कालाखंडात सेवा केली आहे.व आज दिनांक २८ जुलै २०२४ रोजी आज रेल्वेच्या सेवेतून ते सेवा निवृत्त होत आहे.दरम्यान आज ऑल इंडिया ट्रेन मॅनेजर काउंसिल तसेच एन आर एम यू व सी आर एम एस या दौंडच्या रेल्वे संघटना व सर्व नातेवाईक व मित्र मंडळी यांनी आज प्रत्यक्ष भेटून रेल्वे सेवा निवृत्ती बाबत शुभेच्छा दिल्या आहेत.दिलिप किसन नांदखिले हे पोलखोल नामाचे संस्थापक व मालक मुख्य संपादक भरत किसन नांदखिले यांचे जेष्ठ बंधू आहेत.