Home Breaking News एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीचा खून करणा-या आरोपींच्या पिंपरी -चिंचवड पोलिसांनी आवळल्या...

एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीचा खून करणा-या आरोपींच्या पिंपरी -चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

137
0

पिंपरी -चिंचवड २९ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी -चिंचवड शहर हाद्दीतील महाळूंगे पोलिस ठाणे अंतर्गत आंबेठाण येथे रविवारी दिनांक २८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास प्राची विजय माने       ( वय २१ रा.महाळूंगे आंबेगाव)हिचा धारदार शस्त्राच्य सहाय्याने खून एकतर्फी प्रेमातून केल्या प्रकरणी पिंपरी -चिंचवड शहर पोलिस गुन्हे शाखा क्रमांक ३ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे पिंपरी -चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान सदर घटनेप्रकरणी पिंपरी -चिंचवड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी -चिंचवड शहराच्या अतंर्गत येणाऱ्या महाळूंगे पोलिस ठाणे हाद्दीतील आंबेगाव येथे काल रविवारी रात्रीच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीची हत्या एक तर्फी प्रेमातून झाली होती.या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 अविराज रामचंद्र खरात या आरोपींला अटक केली आहे.तपासा दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्राची राहत असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चेक केले असता या सीसीटीव्हीत आरोपी अविराज हा त्याच्या मोटरसायकल वरुन पळून जाताना दिसला यानंतर पोलिसांनी 👮 त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या खूनप्रकरणी पुढील तपास पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.

 

Previous articleमुंबईत मुसळधार पावसामुळे धरणे भरली,केलेली १० टक्के पाणी कपात रद्द
Next articleहेमंत सोरेन यांचा जामीन कायम, ईडीला सुप्रीम कोर्टाचा तगडा झटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here