Home Breaking News दौंड कार्ड लाइनचे नाॅन-इंटरलाॅकिंगचे काम सुरू असल्याने,पुण्यावरुन जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस आज रद्द...

दौंड कार्ड लाइनचे नाॅन-इंटरलाॅकिंगचे काम सुरू असल्याने,पुण्यावरुन जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस आज रद्द तर काहिचा रुट वळवला

137
0

पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मोठी अपडेट आली असून पुणे रेल्वे जंक्शन वरुन सुटणा-या अनेक रेल्वे एक्स्प्रेस आज सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत.मध्यरेल्वे च्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कार्ड लाइन या ठिकाणी नाॅन -इंटरलाॅकि़गचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून. तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

दरम्यान आज रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस या प्रमाणे आहेत.पनवेल – हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे -सिंकदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेस, पुणे -सोलापूर-पुणे -एक्सप्रेस, दौंड -निजामाबाद डेमू , पुणे -बारामती -पुणे डेम्मू, पुणे -दौंड डेम्मू सोलापूर -दौंड – सोलापूर डेम्मू,पुणे-हरगुळ – पुणे एक्स्प्रेस या सर्व रेल्वे ट्रेन आज रद्द करण्यात आल्या आहेत.असे पुणे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनद्वारे कळविण्यात आले आहे.

Previous articleआज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्ररकणी सुनावणी
Next articleमुंबईत मुसळधार पावसामुळे धरणे भरली,केलेली १० टक्के पाणी कपात रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here