पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे आता पूर्णपणे भरलेली आहेत, त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईला आता यापूर्वी केलेली १० टक्के पाणी कपात आजपासून रद्द करण्यात आली आहे.यापूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात अंत्यत कमी पाणि पूर्वा शिल्लक राहिला होता.म्हणून मुंबईत ५ जून पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र आता मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे मुंबई शहर तसेच उपनगर मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण सातही धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.त्यामुळे आज सोमवार दिनांक २९ जुलै पासून कधी लागू करण्यात आलेली पाणी कपात ही रद्द करण्यात आली आहे.असे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.