पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच ठाण्यातून एक खळबळजनक घटना हाती आली असून ठाण्यातील विरार येथे उध्दव ठाकरे गटाचे ठाणे शहराचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचा एका टोळक्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या घटनेनंतर अर्नाळा पोलिसांनी 👮 तातडीने गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद मोरे हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत सेव्हन सी बीच रिसॉर्ट या परिसरात गेले होते.त्यावेळी एका रिक्षावाल्यांकडून मोरे यांच्या पुतण्याला धक्का दिला.यावरुन वाद निर्माण झाला.त्यानंतर रिक्षाचालक यांने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून मोरे यांच्यावर हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात मोरे यांचा मृत्यू झाला.