पुणे दिनांक ३० जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे.पुण्यातील पुरपरिस्थिती बाबत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारी बाज असं म्हटलं होतं.यावर आज अकोला येथे अमोल मिटकरी हे शासकीय विश्रामगृहा च्या बाहेर मिटकरी यांची कार उभी होती.तिथे मनसेचे कार्यकर्ते यांनी जाऊन आमदार अमोल मिटकरी यांची कारवर प्रचंड प्रमाणावर दगडफेक करून ती फोडली आहे.आता घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.