पुणे दिनांक ३० जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पॅरिस येथे ऑलिम्पिकमध्ये भारतीय हाॅकी संघाने आज मंगळवारी आयर्लंडवर २-० अशा फरकाने मात केली आहे.आगदी सुरवातीपासून भारतीय संघाने या सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले होते.भारता कडून कर्णधार हरमनप्रीतने पेनेल्टी स्ट्रोकला गोलमध्ये परावर्तित केले.तर त्यानेच दुसरा गोल देखील केला. भारतीय गोलकीपर श्रीजेशने आयर्लंडच्या आक्रमणला थोपवले.भारताने पॅरिस येथे आतापर्यंत या ऑलिम्पिक स्पर्धेत तीन पैकी दोन सामने जिंकले असून एक सामना ड्राॅ झाला आहे.