पुणे दिनांक ३० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवार दिनांक ३० जुलै राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत , महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणा बाबत शासन धोरण.तसेच पूर्णामाय सहकारी सूत गिरणीला अर्थसहाय्य.राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्यसरकारकडून अर्थसहाय्य.आदिम जमातीतील कुटुंबासाठी आवास योजना.तसेच ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन
दरम्यान राज्यातील वसतीगृह व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ.तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यात मान्यता.एकूण २ हजार ३८५ कोटी प्रकल्पास मान्यता.तसेच आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी मार्फत कर्ज.तसेच आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज. व नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भागभांडवल आदी म्हत्वाचे निर्णय आजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.