पुणे दिनांक ३० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाण्यातील उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेख यांच्या कर्नाटक येथून मुसक्या आवळल्या आहेत.त्याला अटक करुन पोलिस पथक थोड्याच वेळात उरण येथे दाखल होईल अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. तसेच ह्या प्रकणात मोहसीन नावाच्या अन्य व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणी उरण येथे यशश्री शिंदे हिची हत्या दाऊद शेखने केल्याचा आरोप आहे.दरम्यान यशश्री शिंदे ही दोन दिवस घरातून बेपत्ता होती.पोलिसांना तिचा मृतदेह स्टेशन जवळील झुडपात अढाळून आला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.तिच्या तोंडावर मानेवर तसेच गुप्तांगावर वार करण्यात आले होते.तिचा मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला होता.यशश्री शिंदे यांच्या वडिलांनी या प्रकरणी संशयित म्हणून दाऊद शेख याचे नाव घेतले होते.तो कर्नाटकचा रहिवासी होता.पोलिस त्याच्या मागावर होते आज अखेर दाऊद शेखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.व त्याला कर्नाटक येथून घेऊन पोलिस हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.