पुणे दिनांक ३० जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केरळ राज्यातील वायनाड येथे मोठ्या प्रमाणावर आज पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले आहे.मेप्पडीजवळ सदरचे भूस्खलन झाले आहे.या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने डोंगराला तडे गेले आणि मोठमोठे ढिगारे व पाण्यासह खाली आला यात डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक गाडले गेले.दरम्याण या अपघातात आतापर्यंत एकूण १९ लोकांचा मृत्यू झाला आहे.यात लहान मुलांचा देखील समावेश आहे.तर यात १०० पेक्षा जास्त लोक अजूनही ढिगा-याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान केरळ राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने भूस्खलन बाबत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तसेच बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफचे पथक कार्यरत आहेत.तसेच कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी काॅपर्सचे पथक घटनास्थळी उपस्थित आहेत.पहाटे दोनच्या सुमारास लोक साखरझोपेत असतानाच दरड कोसळली तसेच पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठा एक ढिगारा खाली आला आहे.दरम्यान सदरच्या दुर्घटना नंतर लोकसभाचे काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत भूस्खलन पीडितांना दिलासा दिला आहे.तसेच केरळचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधत मदत कार्याचा आढावा घेतला आहे.केरळचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की.वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनसह पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी तातडीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे.तसेच आपत्कालीन मदतीसाठी 9656938689.तसेच. 8086010833 असे क्रमांक जारी करण्यात आले आहे.