पुणे दिनांक ३० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केरळच्या वायनाडमध्ये मुसाळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे.या भूस्खलन मध्ये १०० पेक्षा जास्त नागरिक हे मातीच्या ढिगा-याखाली अडकले आहेत.त्यांच्या बचावकार्या साठी तातडीने प्रशासनाच्य वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.रात्रीच्या सुमारास अचानकपणे भूस्खलन झाले व आज पहाटे देखील सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पून्हा एकदा भूस्खलन झाले आहे.यातील १६ जणांना बाहेर काढून वायनाडच्या मेप्पाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या भूस्खलन नंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे या भूस्खलनच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हे सध्या घटनास्थळी असून त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे.तसेच केरळ राज्याचे मंत्री हे घटनास्थळाच आढावा घेणार आहे.मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुसाळधार पाऊसाने या भागात भूस्खलन झाले आहे.वायनाड मध्ये आता एक कंट्रोल रुम उघडण्यात आले आहे.तसेच मोबाईल नंबर जारी करण्यात आला आहे.हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर हे काही वेळेपूर्वीच तामीळनाडूच्या सुलूरहून वायडनला रवाना झाले आहेत.