Home Breaking News हावडा ते मुंबई एक्सप्रेसचे १८ डब्बे घसरले मोठा अपघात

हावडा ते मुंबई एक्सप्रेसचे १८ डब्बे घसरले मोठा अपघात

78
0

पुणे दिनांक ३० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार हावडा वरुन मुंबईला जाणा-या गाडी क्रमांक १२८१० मुंबई मेल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे.सदरचा अपघात हा झारखंड राज्यातील चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान-बदाबांबो रेल्वे स्थानका  दरम्यान हावडा ट्रेनचे एकूण १८ डब्बे हे रेल्वे ट्रॅक वरुन घसरले आहेत. दरम्यान या अपघातात अनेक प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य सुरू केले आहे.तर यात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर ०६ -५८७२३८०७२ हा नंबर जारी करण्यात आला आहे.

Previous articleठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखचा टोळक्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू
Next articleआज पहाटे केरळमध्ये मुसाळधार पाऊसामुळे भूस्खलन,ढिगा-याखाली १०० पेक्षा जास्त नागरिक अडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here