पुणे दिनांक ३१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ईडीच्या वतीने मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आज महाराष्ट्रात काही ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.यात प्रामुख्याने कर्जत मुंबई.बारामती.तसेच पुण्यात या धाडी टाकल्या आहेत.ईडीने आज पुण्यातील एम.एस.शिव पार्वती साखर कारखाना व इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोप वरुन ईडीकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले आहे.तसेच एम / एस हायटेक इंजिनियरिंग काॅर्पोरेशन इंडिया.प्रा.लि.आणि त्यांचे व्यावस्थापक नंदकुमार तासगांवकर.संजय आवटे.व राजेंद्र इंगवले यांच्या बॅक लोन फसवणूक प्रकरणी हे अभियान राबवण्यात आलं आहे.
दरम्यान आजच्या छाप्यात अनेक संशयास्पद कागद पत्रे.तसेच डिजिटल पुरावे व १९ .५० लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता.याच गुन्ह्यांच्या आधारे ईडीने पुढे तपास सुरू केला ,या कंपन्यांनी तब्बल १०० कोटी कर्ज घेतले होते.मात्र कर्ज मिळवण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी ७१ कोटी रुपये दिले नाही. असं ईडीच्या तपासात समोर आले आहे.तसेच कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे.त्यानंतर ईडीकडून पुढील तपास केला जात आहे.दरम्यान कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि सहायक कंपन्यांनी एम / एस तासगांवकर कन्स्ट्रक्शन लिमिटेड.व एम / एस तासगांवकर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सहयोगी एम / एस हायटेक इंजिनियरिंग काॅर्पोरेशन इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून कर्जाच्या रक्कमचा मोठा हिस्सा हडप केल्याचा आरोप आहे.या फसवणूकीतून सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झाले असून त्यांनी व्यक्तीगत लाभ मिळवला आहे.या प्रकरणी ईडी व सीबीआय पुढील तपासणी सुरू आहे.दरम्यान हायटेक इंजिनियरिंग कंपनीची सहकारी कंपनी म्हणून तासगावकर कन्स्ट्रक्शन काम करत असल्याचा ईडीचा दावा आहे.आमदार रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत हायटेक इंजिनियरिंग कंपनीचे नाव आले होते.या लिलाव प्रक्रियेत रोहित पवार यांनी हायटेक इंजिनियरिंग कंपनीची मदत घेतल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येत होता.