Home Breaking News कार तोडफोड प्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल तर १० जण फरार

कार तोडफोड प्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल तर १० जण फरार

114
0

पुणे दिनांक ३१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची अकोला येथील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर कारची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी पंकज साबळे व सौरभ भगत या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान त्यांना अटक केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर या कार तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचा प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हा फरार झाला आहे.

दरम्यान दुनबळेंनीच मनसेच्या कार्यकर्त्यांना गाडी फोडण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडणारा मनसेचा कार्यकर्ता ज्या मालोकर याला अवस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.आज त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.दरम्यान मालोकर यांच्या मृत्यूनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.आता गाडी तोडफोड प्रकरणी अकोला पोलिसांनी 👮 मनसेच्या एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर यातील १० जण फरार आहे.मिटकरी यांनी राज ठाकरे यांना ‘ सुपारी बाज ‘ असे म्हटले आहे.त्या वरुन हे सारे प्रकरण घडले होते.

Previous articleपुण्यात आज सकाळपासूनच मुसाळधार पावसाला सुरुवात, खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू
Next articleसी.पी.राधाकृष्णन यांनी आज घेतली राज्यपाल पदाची शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here