पुणे दिनांक ३१ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धैत सलग दुसरा सामना जिंकला.तिने राऊंड ३२ मध्ये नेदरलँड्सच्या क्विंटी रोफनचा ६-२ अशा फरकाने पराभूत केले आहे. दीपिकाने ४ पैकी ३ सेटमध्ये ( २९- २८ ,२७-२९, व २५-१७ ,२८-२३ ) हा विजय मिळवला आहे.आता दीपिका या विजयासह प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे.तिचा प्री क्वार्टर फायनलमधील सामना ३ ऑगस्ट रोजी जर्मनीच्या मिशेल क्रोपनशी होणार आहे.