पुणे दिनांक ३१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी.पी.राधाकृष्णन यांनी आज बुधवारी दिनांक ३१ जुलै रोजी शपथ ग्रहण केली आहे.आज त्यांना मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपध दिली , राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांनी राज्यपाल यांना यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत.