पुणे दिनांक ३१ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आज बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.तसेच पुण्यातील सर्वच धरण क्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.तसेच पुणे शहरातील अनेक भागात आज पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे.पुढील दोन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहणार आहे.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात आज सकाळपासूनच मुसाळधार पावसाला सुरुवात झाली आहे.तसेच अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.तसेच पुण्यातील पर्यटकांनी जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जाऊ नये.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.अशातच पुणे हवामान विभागाच्या वतीने पुन्हा एकदा पुणे शहराला पावसाचा अलर्ट दिल्याने आता पुणेकरांच्या चिंतेत वाढली आहे.तसेच धरण क्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने व संततधार सुरू असल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.दरम्यान खडकवासला प्रकल्पातील चार धरणात एकूण जवळ पास ९० टक्के भरले आहेत.आता पुणेकर नागरिकांना पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.तसेच पुण्यातील धरणक्षेत्रात मुसाळधार पावसामुळे मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने हे पाणी पुढे उजनी धरणात जात असल्याने उजनी धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात ८१.४३ टक्के.पाणीसाठा जमा झाला आहे.तर पानशेत धरणात ९१.७६ टक्के पाणी साठा जमा आहे.वरसगाव धरणात ८६.७५ व टेमघर धरणात पाण्याचा साठा ८८.४८ टक्के इतकी आहे. दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात होत असल्याने नदीकाठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.