पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर कृष्णा नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.आता सांगलीतील कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ४१ फुटा जवळ आहे.एकंदरीत कृष्णा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे.तसेच कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे.या मुळे कृष्णा नदीकाठच्या लोकांना व गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान सांगली व कोयना धरण क्षेत्रात मुसाळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सतत चढउतार होत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देखील नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या आहेत.तसे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.