पुणे दिनांक १ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वाघोलीतील बकोरी फाट्या जवळील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत चार जणांच्या टोळक्याने मिळून एका युवकावर कोयत्याच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केला आहे.यात त्याच्यावर वार करण्यात आले आहे.या हल्ल्यात सदरचा युवक हा गंभीररीत्या जखमी झाला आहे.दरम्यान भर चौका मध्ये व गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.यात पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटने संदर्भात मिळालेली माहिती अशी की.सदरचा युवक हा खाऊ गल्लीतून जात असताना चार जणांच्या टोळक्याने त्याला गाठून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे.तसेच सदरचा हल्ला केल्याचा व्हिडिओच सोशल मीडियावर टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.यातील सर्व हल्लेखोर हे अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.याबाबत आता लोणीकंद पोलिसांनी 👮 या प्रकरणी अज्ञात चार जणांच्या टोळक्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान या टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर रित्या जखमी झालेल्या युवकांवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या टोळक्याने या युवकांवर हल्ला का केला? या मागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.दरम्यान कोयत्याने हल्ला करून त्याचे रिल बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यापर्यंत या युवकाची मजल गेली आहे.