पुणे दिनांक १ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार युपीएससी परीक्षेत घोटाळा करून उमेदवारी मिळवणा-या पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली येथील पटियाला कोर्टाने आज गुरुवारी फेटाळला आहे.त्यामुळे पूजा खेडकरला आता मोठा झटका बसला असून पूजाला आता कधीही अटक होऊ शकते.दरम्यान कालच बुधवारीच पूजा खेडकर हिच्यावर युपीएससीच्या वतीने कठोर कारवाई करत तिची उमेदवारी रद्द केली आहे.तसेच यापुढे भविष्यात तिला कोणत्याही परिक्षा देण्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान पूजा हिचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर युपीएससीच्या वतीने तिच्यावर गुन्हा दाखल केला होता.तसेच तिला आपली याबाबत बाजू मांडण्यासाठी काल बुधवारी ३१ जुलै दुपारपर्यंत वेळ दिला होता.पण यावर पूजाने काहीच उत्तर दिले नव्हते.तसेच तिला तीन वेळेस समन्स बजावण्यात आले होते.हजर रहाण्याचे निर्देश दिले होते.तिने याची कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही.व दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.अर्जावर सुनावणी झाली होती.पण निकाल राखून ठेवण्यात आला होता.आज हा निकाल देताना कोर्टाने पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.यानंतर पूजा खेडकर हिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आता पोलिसांना पूजा हिला शोधून काढून अटकेची कारवाई करावी लागणार आहे.