Home अंतर राष्ट्रीय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसळेने जिंकले पदक, वडिलांची प्रतिक्रिया मुलाचा आम्हाला अभिमान

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसळेने जिंकले पदक, वडिलांची प्रतिक्रिया मुलाचा आम्हाला अभिमान

    68
    0

    पुणे दिनांक १ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे.त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोजिशन क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.स्वप्निल हा मुळांचा महाराष्ट्रातील कोल्हापूरचा नेमबाज आहे.त्यांने काल बुधवारीच या क्रीडा प्रकारात फायनल गाठली होती.यात स्वप्निलचे सुवर्ण थोडक्यात हुकले.तर चीनने यात बाजी मारली आहे.तर यात युक्रेनने रौप्यपदक पदी बाजी मारली  दरम्यान आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने तीन कांस्य पदक जिंकले आहेत.

    दरम्यान पॅरिस येथे ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकल्या नंतर संपूर्ण कोल्हापूर नागरिक व त्याच्या कुटुंबाने यावेळी आनंद व्यक्त केला आहे.यावेळी स्वप्नीलच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली की.मला विजयाची खात्री होती.मागील १२ ते १३ वर्षांपासून स्वप्निलने घेतलेले कष्ट आज सार्थ ठरले आहे.त्यांने देशाचा तिरंगा खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान आहे, त्याच्या यशात आमच्या सोबतच त्याच्या कोच दीपाली देशपांडे यांचेही मोठे यश आहे.असे त्यांनी म्हटले आहे.

    Previous article‘ मला गोळ्या घाला, आरोपींना अटक केल्याशिवाय अकोला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरुन हालणार नाही’, आमदार -अमोल मिटकरी
    Next articleपूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला! कोणत्याही क्षणी होणार अटक

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here