Home Breaking News ‘ मला गोळ्या घाला, आरोपींना अटक केल्याशिवाय अकोला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरुन हालणार...

‘ मला गोळ्या घाला, आरोपींना अटक केल्याशिवाय अकोला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरुन हालणार नाही’, आमदार -अमोल मिटकरी

117
0

पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर अकोला विश्रामगृहाच्या बाहेर मनसे च्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करून नुकसान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात वाद विकोपाला गेला आहे.यातील आरोपींवर कारवाई करण्यास अकोला पोलिस टाळाटाळ करत आहेत. या मधील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी आमदार अमोल मिटकरी हे त्यांचे भाऊ व मुलगी यांच्यासह अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत.

दरम्यान याप्रकरणी मनसेचे राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अकोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर दगडफेक करून ती फोडली होती.याबाबत पोलिसांनी 👮 यातील मनसेच्या १३ कार्यकर्त्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील काही अटक करण्यात आलेल्या आरोपींना जामीन देखील मिळाला आहे.यातील पाच अन्य फरार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कार तोडफोड प्रकरणी पोलिस कारवाई करत नाहीत.असा आरोप करत आमदार अमोल मिटकरी हे भाऊ व मुलगीसह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान यावेळी ‘ आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केले की.या हल्ल्यानंतर कुटुंबातींमध्ये दहशतीचे वातावरण आहे.मुलगी शाळेत जाताना मुलीच्या बसचा पाठलाग होत आहे का ? हे तिच्या निदर्शनास आले.कर्णबाळा व देशपांडे धमक्या देत आहेत.बापाचे राज्य आहे का ? असा सवाल यावेळी संतप्त होत आमदार मिटकरी यांनी यावेळी केला आहे.दरम्यान या प्रकरणात  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी यांच्या पाठबळावरच यातील काही आरोपी हे मोकाट फिरत आहेत.यातील उर्वरित सर्व आरोपींना तातडीने अटक करा.अशी मागणी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात तक्रार करणार आहे.गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी फोन करून देखील अकोला पोलिस गांभीर्याने घेत नाही.उद्या मला व माझ्या कुटुंबाला काहीही झाल्यास याला पोलिसच जबाबदार असणार आहे.असे देखील आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Previous articleवायनाड मध्ये मृतांची संख्या २५६ वर अजून २४८ जण बेपत्ता, राहुल व प्रियांका गांधी वायनाड मध्ये दाखल
Next articleपॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसळेने जिंकले पदक, वडिलांची प्रतिक्रिया मुलाचा आम्हाला अभिमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here