Home Breaking News राज्यात पुन्हा मुसाळधार पाऊस, पुढील चार दिवस अनेक भागात जिल्ह्यात मुसळधार पाऊस

राज्यात पुन्हा मुसाळधार पाऊस, पुढील चार दिवस अनेक भागात जिल्ह्यात मुसळधार पाऊस

81
0

पुणे दिनांक १ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज हवामान विभागाच्या वतीने मुंबई व कोकणात.पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. व या कालावधीत प्रवास टाळण्यासाठी देखील हवामान विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान मागिल काही दिवसांपासून पुणे व मुंबई तसेच कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता.मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतली होती.मात्र पुणे शहर व जिल्ह्यात सारख्या स्वरूपाचा पाऊस सुरूच होता आता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे.आता दोन दिवस विश्रांतीनंतर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.पुढील चार दिवस १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वत्र पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे.हवामान विभागाच्या वतीने रायगड.रत्नागिरी .या कोकण पट्ट्यात तसेच सातारा.कोल्हापूर पुणे.गोंदिया चंद्रपूर.विदर्भ.गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच मुंबई.ठाणे.वर्धा. सिंधुदुर्ग.यवतमाळ . नागपूर.भंडारा.या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.या भागात अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleपॅरिस ऑलिम्पिकमध्ये दीपिका कुमारची प्री क्वार्टर फायनलमध्ये एंट्री
Next articleकृष्णा नदीने ओंलडली धोक्याची पातळी,सांगलीकरांना सतर्कतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here