पुणे दिनांक २ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोल्हापूर येथील पाण्याचा पूरात ट्रॅक्टर ट्राॅलीसह वाहून गेला आहे.यात आठ मजूरांचा समावेश असून यातील तीन मजूर हे पूराच्या पाण्यातून पोहोत बाहेर आले आहेत तर यातील पाच मजूर पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.सदरची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील बस्तवडे गावातील आहे.ट्रॅक्टर ट्राॅलीमधून शेतकरी मजूर हे कामावर जात असताना सदरचा ट्रॅक्टर हा ट्राॅलीसह पूराच्या पाण्यात वाहून गेला आहे.या दुर्घटने मध्ये तीन मजूर हे पूराच्या पाण्यातून पोहोत नदीच्या पात्राबाहेर आले आहे.तर अन्य पाच मजूर हे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोल्हापूरात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे या भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. यातच ही मोठी दुर्घटना घडली आहे.घटनास्थळी पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले असून यात पूरात बुडालेल्या पाच मजूरांचा शोध घेतला जात आहे.असे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.